नवी दिल्ली : कोरोना विरुद्धच्या लढाईत भारत अजून हिंमत हरलेला नाही, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातल्या एकूण 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 19 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. या मदतीचा आठवा टप्पा जमा करण्यात आला. तसेच बंगालमधल्या शेतकऱ्यांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळत असल्याचंही मोदींनी यावेळी सांगितलं. मोदींनी यावेळी कोरोनावरही भाष्य केलं.
दरम्यान, देशातल्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात असल्याचं मोदींनी सांगितलं. नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशात आत्तापर्यंत 18 कोटी लोकांनी लस घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
धनंजय मुंडेेंसोबतच्या नात्यासंबंधीचा उलगडा पुस्तकातून करणार; करूणा मुंडेंची पोस्ट चर्चेत
“भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण”
…तर मुंबईकरांना अजून 15 दिवसांची शिक्षा कशासाठी?; नितेश राणेंचा ठाकरे सरकारला सवाल
“27 जून रोजी होणारी UPSC ची परीक्षा रद्द; नवीन तारीख जाहीर”