मेलबर्न : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सनी पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 70 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान टीम इंडियाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. भारताकडून शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने 51 धावांची नाबाद विजयी भागीदारी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणेने नाबाद 27 तर शुभमन गिलने नाबाद 35 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना दुसऱ्या डावात 200 धावांवर रोखलं. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर सलामीवीर मॅथ्यू वेडने 40 धावा केल्या. तर पॅट कमिन्सने 22 धावांची झुंजार खेळी केली. भारताकडून दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जाडेजा, आर अश्विन आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या. तर उमेश यादवने 1 बळी टिपला.
2nd Test. It’s all over! India won by 8 wickets https://t.co/HL6BBEW6uY #AUSvIND
— BCCI (@BCCI) December 29, 2020
महत्वाच्या घडामोडी-
जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…; आठवलेंचा कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा
केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार; नारायण राणेंकडून डेडलाईन जाहीर
“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”
“मै बाळासाहेब ठाकरेंका शिवसैनिक हूँ, मी कुणाला घाबरत नाही”