भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना! विराट कोहलीची एकाकी झुंज, पहिल्या दिवसाअखेर भारत 6 बाद 233

0
314

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं पहिल्या दिवसाअखेर 89 षटकांत 6 बाद 233 धावांपर्यंत मजल मारली आहे. कोहलीनंतर चेतेश्वर पुजारा 43 धावा, आणि अजिंक्य रहाणे 42 धावांची खेळी करत भारताच्या धावसंख्येत योगदान दिले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्यावर कमिंसच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर मयांक अग्रवालही (17) धावावर बाद झाला. त्यानंतर अनुभवी पुजारा आणि विराट कोहली यांनी संयमी फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी केली. मात्र नॅथन लॉयननं पुजाराला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर वृद्धिमान साहा (9) तर आर. अश्विन (15) यांनी नाबाद खेळी करत ऑस्ट्रेलियन संघाला आणखी यश मिळू दिलं नाही.

महत्वाच्या घडामोडी-

संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी- प्रवीण दरेकर

जगातील सुंदर महिलांपैकी एक असलेल्या मिस वर्ल्ड मानुषीचा BOLD अंदाज

आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नाही; अरविंद केजरीवालांचा योगींना टोला

“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here