Home महाराष्ट्र सदस्य संख्या इतकी वाढवा की…; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

सदस्य संख्या इतकी वाढवा की…; उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेसोबत बंडखोरी कर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. त्यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपल्या गटातील लोकांना सोबत घेत पक्षबांधणीला सुरूवात केली आहे. आजही काही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्याकडे 11 हजार नवीन सदस्य नोंदणीची कागदपत्रे जमा केली आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

नवीन सदस्यांचे सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी टेम्पो, ट्रक कमी पडले पाहिजे, इतकी सदस्यसंखा वाढवा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केलं.

हे ही वाचा : ‘…या कराणामुळे एकनाथ शिंदे चिंतेत’; उद्धव ठाकरे घेणार पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ?

“सदस्यपत्र आणि शपथपत्र घेऊन जाण्यासाठी ट्रक, टेम्पो कमी पडले पाहिजेत, एवढी आपली सदस्यसंख्या वाढत आहे. ही सगळी तुमची मेहनत आहे. आपल्याकडे आता कुणी भाडोत्री लोकं राहिली नाहीत. जे आहेत ते सर्वजण तन-मन-धन सर्वस्व भगव्यासाठी वाहून टाकणारी लोकं आहेत. बाकी जे काही बोलायचं आहे, ते मी दसरा मेळाव्यात बोलणारच आहे. याबाबत काहीही वाद नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीचा मोठा डाव; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज ठाकरे यांची भेट होणार की नाही? ; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

अशोक चव्हाण-देवेंद्र फडणवीस भेटीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले…