टेस्टिंग वाढवा, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करा; फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन

0
148

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने टेस्टिंग वाढवावी, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना आर्थिक मदत करावी, असं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन तिथला आढावा घ्यावा, तिथली काय परिस्थिती जाणून घ्यावी, एखाद्या भागात काही अडचणी असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवून सोडवण्याचा प्रयत्न करावा, या उद्दीष्टाने दौऱ्याला सुरुवात केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

दरम्यान, पुणे महापालिकेने कोरोनाविरोधाच्या लढाईत आतापर्यंत जवळपास 150 कोटी रुपये खर्च केले. ते आवश्यकदेखील आहे. पण, राज्य सरकारनेदेखील महापालिकांना मदत करायला हवी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार; राज्य सरकारचा इशारा

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची? आदित्य ठाकरेंचा प्रकाश जावडेकरांना प्रश्न

…तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार; हसन मुश्रिफ यांचं चंद्रकांत पाटलांना आव्हान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here