सांगली : सांगली जिल्ह्याच्या कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आहे. सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी, जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत.
कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी अजुन वाढली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोहोचली आहे.
दरम्यान, सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवडे प्लॉट, साईनाथकॉलनी, दत्तनगर, इनामदार प्लॉट येथील 200 लोक स्थलांतरित केले आहेत. येथील लोकं स्वतःहून अन्य ठिकाणी राहण्यास गेले आहेत. तसेच सांगली महापालिकेच्या निवारा केंद्रात 36 लोकं स्थलांतरित झाली आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
संजय राऊत यांनी डॉक्टरांविषयी असं बोलणं योग्य नाही- देवेंद्र फडणवीस
फालतू आणि भामट्या लोकांना आम्ही सोबत घेत नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊ खोतांना टोला
लवकरात लवकर वाहतूक चालू करा, मंदिरं सुरू करा नाहीतर…; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा
मनसे शहराध्यक्षांच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचं ट्विट; कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन