आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्ली उच्च न्यायालयात तीन जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयात तीन जणांविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता उच्च न्यायालयाने तिघांना समन्स बजावत प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
हे ही वाचा : संजय शिरसाटांना ‘ते’ वक्तव्य भोवणार?; सुषमा अंधारेंनी केली महिला आयोगाकडे तक्रार दाखल
शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात एक याचिका दाखल केली होती. यामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्यांच्यावर गद्दार, चोर, पन्नास खोके एकदम ओके यासह विविध प्रकारच्या संदर्भात टीका करण्यात आली होती.
दरम्यान, निर्णयाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाकडून समन्स बजावले जाणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसला तुम्ही पाठिंबा दिला, मग आता का…; मनसेचा उद्धव ठाकरेंना सवाल
‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ‘या’ अभिनेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
सत्तेसाठी उध्दव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला; भाजपच्या ‘या’ नेत्याचा आरोप