कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

0
343

सांगली : कोरोनाच्या प्रश्वभूमीवर माणुसकीला काळीमा फासणारी घटना मिरज येथे घडली आहे. मिरजमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउन असल्यने तरुणी मिरजमध्येच अडकली होती. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींनी अटक केली आहे.

कोल्हापूर येथील ही तरुणी मिरजेत मैत्रिणीकडे आली होती. लॉकडाउन असल्याने पुन्हा घरी जाणं तिला शक्य नव्हतं. पीडित तरुणी व तिची मैत्रीण रात्री घराबाहेर गप्पा मारत बसल्या होत्या. काही वेळाने मैत्रीण निघून गेली. पीडित तरुणी एकटी असल्याचं पाहून आरोपी अक्षय राजू कनशेट्टी (21) आणि राजू बाबू अचूदन (30) या दोघांनीही फायदा घेतला. आरोपींनी पीडीत तरुणीला बळजबरीने दुचाकीवर बसवून गजानन मेडिकल शेजारी निर्जनस्थळी नेले.तिथे पीडित तरुणीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याबाबत सपीडित तरुणीने गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून अत्याचार केलेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का?; संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

आपण लढणार आपण जिंकणार; मुख्यमंत्र्याचा व्हिडीओतून ‘पॉवरफूल’ संदेश

…तो पर्यंत महाराष्ट्रात हिंदूंनाच मार खावा लागणार का?; निलेश राणेंचं अनिल देशमुख यांच्यावर टिकास्त्र

सांगलीतील रुग्णाला वाचवता आलं नाही याची खंत- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here