Home पुणे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे :  जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय पातळवरील खेळाडू घडविण्याचे काम होत आहे. खेळातून खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य सदृढ होत असते. सकारात्मकता, चिकाटी, दूरदृष्टी याचे उपयोजन करून खेळात यश संपादन करता येते. विज्ञानातील तथ्य दिशा, वेळ आणि गती यांचा मेळ साधत यशाला गवसणी घालता येते. येथे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक जाणिवा विकसित करणारे संदेश हे सामाजिक अभिसरण घडविणारे आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद असून ही संस्था लवकरच स्वतंत्र विद्यापीठ म्हणून नक्कीच पुढे येईल. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात आयोजित जिल्हा क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. गोसावी बोलत होते. या प्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी विद्यार्थी संघाचे सचिव एम. एस. जाधव, जेष्ठ नेते विजय कोलते, बाळासाहेब भिंताडे, योगेश फडतरे, युनिस स्पोर्ट्सचे मृणाल पाठक, योगेश रवदंळे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी या स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास पोषक वातावरण निर्माण होते. ग्रामीण भागातील बहुजन समाजातील खेळाडू या स्पर्धेतून तयार होवून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय होत आहेत. संस्थेचा क्रीडामहोत्सव हा राष्ट्रीय दर्जाच्या महोत्सवाला साजेसा आहे. खेळामध्ये जय पराजयापेक्षा सहभाग महत्वाचा आहे. खेळामुळे संघकार्य, समन्वय, आत्मविश्वास, नियोजन हे गुण आत्मसात होतात. खेळात जिंकण्यासाठी मनातजिंकता आलं पाहिजे. खेळात यश मिळवण्यासाठी यशाचा आराखडा तयार केला पाहिजे असे सांगितले. विजय कोलते यांनी खेळातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सध्या वैभवाचे दिवस सुरू असून शिक्षणाचे उत्तम कार्य संस्थेकडून होत असल्याचे सांगितले.

ही बातमी पण वाचा: “वंदे भारत चक्क रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पोहचली कल्याणला”

प्रास्ताविकात ॲड. संदीप कदम यांनी संस्थेच्यावतीने घेतल्या जात असलेल्या क्रीडामहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी व उत्तेजन मिळत आहे व त्यामुळे आपल्या अनेक विद्यार्थ्यांची जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून विद्यार्थ्यांमधील क्रीडावृत्तीस चालना मिळाली आहे. या क्रीडा स्पर्धांमुळे आजअखेर आंतरराष्ट्रीय पातळीवर ६७, राष्ट्रीय पातळीवर ४१६, राज्य पातळीवर ७०४, अशा एकूण ११८७ खेळाडूंची निवड झाली. त्यापैकी आंतरराष्ट्रीय पातळीवर ४६, राष्ट्रीय पातळीवर २२३, राज्य पातळीवर ५२० अशी एकूण ७८९ पदके विविध खेळाडूंना प्राप्त झाली असल्याचे सांगितले.

कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छात्रसेना, स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. राष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा जगताप हिने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आभार प्राचार्य डॉ.पंडीत शेळके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड, डॉ. किरण गाढवे यांनी केले. संस्थेतील सर्व शाखाप्रमुख आणि क्रीडाशिक्षकांनी या क्रीडा महोत्सवाचे संयोजन केले.

महत्त्वाच्या बातम्या –

रामदास आठवले महायुतीवर नाराज? म्हणाले, “मी आणि माझे कार्यकर्ते…”

कला विश्वावर मोठी शोककळा; प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन

फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; वाचा यादी!