Home देश आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- पंतप्रधान...

आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भर भारतचं दर्शन, हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बजेटमध्ये सर्वांचा विचार करण्यात आला आहे. हा बजेट एक सकारात्मक बदल घडवेल. त्याचबरोबर या बजेटमध्ये सर्वसामान्यांवर कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही, असं नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच आजचा बजेट भारताच्या आत्मविश्वासाला जागरुत करणारा आहे. त्याचबरोबर हा बजेट जगात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण करणारा आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या बजेटमध्ये तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या राज्यांना एक बिझनेस पॉवर बनवण्याच्या दृष्टीकोनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचललं गेलं आहे. या बजेटमुळे युवकांना ताकद मिळेल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

संकटात सापडलेल्या समाजाच्या सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – चंद्रकांत पाटील

“संकटाचं संधीमध्ये रुपांतर कसं करतात हे दाखवणारा आजचा अर्थसंकल्प”

निवडणुका असलेल्या राज्यांना जास्त गिफ्ट, महाराष्ट्रासाठी काय?; बजेटवरून आदित्य ठाकरेंचा केंद्राला सवाल

“केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलंय”