मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या मुद्दयावरून तयार झालेल्या स्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्या, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
मला वाटतं या प्रकरणात समन्वयाचा अभाव तर आहेच, मात्र, एक प्रकारचा अविश्वास देखील आहे. गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील असतात म्हणूनच ते मंत्री असतात. मात्र, आता जी परिस्थिती दिसते त्यावरुन गोंधळच असल्याचं दिसत आहे. या साथीच्या रोगाच्या स्थितीत गोंधळ योग्य नाही. अधिक समन्वय ठेवावा आणि विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, ज्याला जे वाटेल ते ते करतात. कधी अधिकारी निर्णय घोषित करतात, कधी मंत्री तर कधी मुख्यमंत्री निर्णय घोषित करत आहेत, असंही देवेंद्र फडणावीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण…- संजय राऊत
निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना; ‘या’ नेत्याची जीभ घसरली
“पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण”
शरद पवार यांच्या सूचनांबाबत मुख्यमंत्र्यांनी ठरवावं- देवेंद्र फडणवीस