Home महाराष्ट्र हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? शिवसेनेचं भाजपवर...

हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? शिवसेनेचं भाजपवर टीकास्त्र

मुंबई : उत्तरप्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून हाथरस, बलरामपूर प्रकरणात हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आह? असा सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधू पुरुषांची जमावाने हत्या केली तेव्हा वेदनेने तळमळणाऱ्या योगींचे विधाने आम्ही पाहिली आहे. संपूर्ण भाजप तेव्हा हिंदुत्वाच्या नावाने शंख फुकत होता. मग हाथरस, बलरामपूर प्रकरणात हा हिंदुत्वाचा शंखनाद थंड का पडला आहे? असं म्हणत सामनाने भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

देश इतका निर्जीव, हतबल कधीच झाला नव्हता. चारशे-पाचशे वर्षांपूर्वीची बाबरी पाडली म्हणून पेटलेला हा देश एका मुलीच्या देहाची विटंबना होऊनही थंड पडला असेल तर या देशाने सत्त्व गमावले आहे. समाज नपुंसक बनला आहे आणि मतदार गुलाम झाला आहे. हाथरसच्या मातीत राख होऊन हुंदके देणाऱ्या ए अबले, आम्हाला माफ कर., असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईत एका नटीचे बेकायदा बांधकाम कायद्याने तोडले म्हणून कर्कश मीडियाचे अँकर्सही आज तोंडात बोळे कोंबून बसले आहेत, अशी टीकाही सामनातून भाजपवर करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी-

हाथरस घटनेवर भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाहीत?- इम्तियाज जलील

हाथरस घटनेतील चारही आरोपींना फासावर लटकवायला हवं- रामदास आठवले

“सनरायजर्स हैदराबादचा चेन्नई सुपर किंग्जवर रोमहर्षक विजय”

महाराष्ट्रात जरा काय घडलं की राष्ट्रपती राजवटीची मागणी करणारे कुठे आहेत?- अमोल कोल्हे