Home पुणे 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष- नाना...

2024 च्या निवडणुकीत काँग्रेस असेल सर्वात मोठा आणि सत्तेतील प्रमुख पक्ष- नाना पटोले

इंदापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असेल, तसंच काँग्रेस हा सत्तेतला प्रमुख पक्ष राहील, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते इंदापूरमध्ये बोलत होते.

आमच्याकडे पक्षाला मानणाऱ्या लोकांसाठी जागा आहे, संधीसाधूंसाठी नाही. आमची दारं सगळ्यांसाठी उघडी आहेत, असंही ते म्हणाले. तसंच, ‘इंदापूरमधला पुढचा आमदार हा काँग्रेसचा असेल’ असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

तुम्ही हे वाचलात का?

अभिनेत्री अंकिता लोखंडेचा बो’ल्ड लुक मधील डान्सचा व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ

दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोलेंनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपचं सरकार सत्तेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये लोकांनीच त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. खोटी आश्वासन देणं आणि लोकांची दिशाभूल करणे एवढाच फडणवीस यांचा धंदा आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का?; अजित पवारांचा टोला

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा