आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली-: सोशल मीडियावर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि तिचा मंगेतर पलाश यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही व्हायरल पोस्ट्समध्ये पलाशने स्मृतीशी केलेल्या नात्याशी बेईमानी केल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र हे सर्व दावे अप्रमाणित असून, दोन्ही बाजूंनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
ट्विटरवरून सुरुवात… पोस्ट्स व्हायरल
एका यूजरने केलेल्या पोस्टनुसार, लग्नाच्या आदल्या रात्री पलाशने एका कोरिओग्राफरसह “धोका” दिल्याचा दावा करण्यात आला. त्या यूजरने लिहिले की,
“स्मृतीसारख्या मुलीचं मन जिंकल्यावर तिच्याच लग्नाच्या दिवशी फसवणूक करणं लाजिरकं आहे…”
दुसऱ्या एका स्पोर्ट्स अपडेट अकाऊंटनेही अशाच प्रकारची माहिती पोस्ट करत सांगितले की पलाशच्या तब्येतीबाबत आलेली रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी ही खरेतर “कव्हर-अप” होती, असा दावा करण्यात आला. मात्र या दोन्ही दाव्यांची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
इंस्टाग्रामवरील हालचालींची चाहत्यांकडून चर्चा
काही चाहत्यांनी स्मृती मंधानाने तिच्या प्री-वेडिंग पोस्ट्स हटवल्याचे स्क्रीनशॉट शेअर केले. तिची मैत्रीण आणि सहक्रीडा खेळाडू जेमिमा रॉड्रिग्ज हिनेही एंगेजमेंटनंतरचा रील हटवल्याचे नमूद करण्यात आले.
तथापि, सेलिब्रिटी अकाऊंटवरील पोस्ट्स हटवणे यामागे अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे चाहत्यांमध्ये यावरून विविध कयास लावले जात आहेत.
‘खरी माहिती’ अद्याप बाहेर नाही
– या प्रकरणात ना स्मृती,
– ना पलाश,
– ना कोणत्याही कुटुंबीयांनी
अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
त्यामुळे सोशल मीडियावर फिरत असलेले सर्व दावे हे फक्त चर्चांच्या आधारावर आहेत.
चाहत्यांची चिंता पण अधिकृत घोषणा महत्त्वाची
क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावरील अनुयायांमध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली असली, तरी वास्तविक परिस्थिती समजण्यासाठी दोन्ही बाजूंकडून अधिकृत निवेदन येणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारताकडे तिसरा वर्ल्डकप.. क्रिकेटनंतर आता कब्बडीतही मुलींची बाजी!
स्मृतीच्या वडिलांनंतर तिचा होणारा पती पलाशचीही तब्येत बिघडली; सांगलीत तातडीने दाखल”

