Home महाराष्ट्र सांगलीत शिवसैनिकांनी रूग्णांना मिळवून दिला न्याय, हाॅस्पिटलने फसवणूक केलेली रक्कम दिली परत

सांगलीत शिवसैनिकांनी रूग्णांना मिळवून दिला न्याय, हाॅस्पिटलने फसवणूक केलेली रक्कम दिली परत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : सांगली येथील सेवासदन हाॅस्पिटलमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांची तक्रार दिवसेंदिवस वाढत होती.

रूग्णांच्या नातेवाईकांनी शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्याशी संपर्क साधून सेवासदन हाॅस्पिटलबाबत सर्व हकीकत सांगितली असता, मयूर घोडके यांनी मिरज तालुका प्रमुख संजय काटे यांच्या मदतीनं आलेल्या तक्रारधारकांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या असता जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या नातेवाईकांची हाॅस्पिटलने फसवणूक झाली आहे त्यांची चाैकशी करून रूग्णांच्या नातेवाईकांना महात्मा जोतिबा फुले योजने अंतर्गत झालेल्या फसवणूकीची रक्कम परत करावी व म़ृत्यूचा दाखला त्वरीत मिळावा यासाठी आरोग्य विभागाला आदेश दिला.

हे ही वाचा : सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे

शिवसेनेनं महात्मा जोतिबा फुले योजनेमार्फत झालेल्या फसवणुकीचा पर्दाफाश केला असता सेवासदन हाॅस्पिटलने रूग्णांच्या नातेवाईकांकडून घेतलेली रक्कम नातेवाईकांना चेकद्वारे परत केली आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करून,पाठपूरावा करून, अहोरात्र प्रयत्न केले.

दरम्यान, रकमेचा चेक व मृत्यू दाखला परत मिळताच नातेवाईकांनी शिवसेना सांगली शहर प्रमुख मयूर घोडके व शिवसेना मिरज तालुका प्रमुख संजय काटे यांचे आभार मानले.

महत्वाच्या घडामोडी –

सुप्रिया सुळे यांच्या नातेवाईकांवर छापेमारी झाली ती योग्यच होती- नारायण राणे

मीही इंग्रजीत प्रश्न विचारला असता पण…; विनायक राऊतांनी नारायण राणेंना डिवचलं

गेली 25 वर्षे त्यांची महापालिकेवर सत्ता आहे, पण…; मनसेचा शिवसेनेवर हल्लाबोल