“रायगडमध्ये शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार; सरपंच, उपसरपंचासह सदस्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

0
538

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रायगड : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता रायगडमध्ये शिवसेनेनं भाजपला खिंडार पाडलं आहे.

रायगड जिल्ह्यातील कानपोली ग्रामपंचायतीतील भाजपच्या सरपंच, उपसरपंचांनी भाजपला धक्का देत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण; किशोरी पेडणेकरांची टीका

दरम्यान, शिवसेनेचे रायगड- पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या प्रयत्नातून भाजपच्या कानपोली येथील सरपंच सौ.विजया कैलास पाटील, उपसरपंच श्री.नागा गिरा, सदस्य श्री.हिरामण उघडा व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी शिवबंधन हाती बांधलं.

महत्वाच्या घडामोडी –

अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही”

मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here