Home पुणे पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पुणे हा काँग्रेस विचारांचा जिल्हा आहे, या जिल्ह्यात आजही काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. सातत्याने काँग्रेसचा झेंडा या भागात फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो तसाच फडकत राहील., असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा : “ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सूरू होणार”

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढेल त्यादृष्टीने काम करा. पुणे जिल्ह्याबरोबरच 2024 साली राज्यातही काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची मतं वाढली आहेत. पुणे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, पुणे जिल्हा काँग्रेसचा पारंपरिक जिल्हा असून दुसऱ्यांना मागणार नाही, काँग्रेस येथे स्वबळावर लढेल, त्याची तयारी केली आहे. पुढचा काळ पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी चांगला काळ असेल. पक्ष संघटना मजबूत करा आपल्याला यश मिळेल असा विश्वास नाना पटोलेंनी यावेळी बोलून दाखवला.

महत्वाच्या घडामोडी –

सुशांत सिंग राजपूतची हत्या होऊनही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मात्र…; नारायण राणेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादीकडून मनसेला खिंडार; मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’; एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा टोला