Home पुणे गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा आज १५ जून रोजी सुरू झाल्या आहेत. गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी मुलांचे पुष्पवृष्टी करत वेलकम कार्ड, स्माईली फुगे, बिस्किटे , चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला ॲडव्होकेट शेखर फराटे,ॲडव्होकेट सुमित नागवडे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रशालेत अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम होत असतात या उपक्रमांचे ॲडव्होकेट शेखर फराटे यांनी कौतुक केले.

ही बातमी पण वाचा : पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…

दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. प्रवेशोत्सवातील उपक्रमांची संकल्पना रणजित बोत्रे यांची होती. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्येष्ठ शिक्षिका गीतांजली कांबळे,मंदाकिनी बलकवडे,रणजित बोत्रे,दिपाली गावडे, विशाल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

महत्त्वाच्या बातम्या –

माझ्या विजयामध्ये…; बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट

अजित पवार यांनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाले…

निरुपयोगी झालं की काढून फेकायचं; मंत्रिपदावरून काँग्रेसचा अजित पवार गटाला टोला