महापालिका निवडणुकीसाठी ‘मनसे’ मैदानात; ‘या’ दिवशी होणार मनसेची बैठक

0
640

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबईः आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कंबर कसली असून त्यासाठी येत्या 2 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे बैठक घेणार आहेत, या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.

मनसेची 2 फेब्रुवारी रोजी बांद्रा एमआयजी क्लब येथे सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे येथील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतः राज ठाकरे चर्चा करणर आहेत. ते तेथील परिस्थितीचा त्यांच्याकडून आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या बैठकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा : किराणा दुकानात आला दारूचा माल…; रामदास आठवलेंनी काव्यमय शब्दात उडवली ठाकरे सरकारची खिल्ली

दरम्यान,राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा येथे महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मोदी सरकारने देशद्रोह केला; पेगासस साॅप्टवेअर खुलासा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल

मनसेचा भाजपला धक्का, नंदूरबारमधील ‘या’ नेत्यानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, दिव्यातील ‘या’ मोठ्या नेत्यानं कूटूंबासह हाती बांधलं शिवबंधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here