Home महाराष्ट्र महाराष्ट्रात कायदाराज नाही गुंडाराज सुरू; चित्रा वाघ यांची टीका

महाराष्ट्रात कायदाराज नाही गुंडाराज सुरू; चित्रा वाघ यांची टीका

मुंबई : कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे  यांच्यावर फेरीवाल्याने कोयत्याने हल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटल्याची घटना घडली. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ  यांनी या घटनेचा निषेध करत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

ठाणे मनपा उपायुक्त कल्पिता पिंपळे कर्तव्यावर असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत बोटे छाटण्यात आली. हे लिहितानाही जीवाचा थरकाप होतोय… सुदैवाने त्या व अंगरक्षक पालवे वाचले. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते… कायदाराज नाही गुंडाराज सुरू आहे इथे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलें आहे.

दरम्यान चित्रा वाघ यांनी आयुक्त कल्पिता पिंपळे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली . यावेळी वाघ यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर आपण परमनंट लॉकडाऊनमध्ये गेलो असतो”

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी युती नको, स्वबळावर सत्ता मिळवू”

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

महाराष्ट्र बंदिवान केल्याचा रेकॉर्ड उद्धव ठाकरेंच्या नावावर- आशिष शेलार