कोल्हापूर : विनयभंग आणि अश्लील शिवीगाळीचा प्रकार सहन न झाल्याने प्राजक्ता सुरेश बाऊचकर या तरूणीने तणनाशक प्राशन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नणुंद्रे (ता.पन्हाळा) येथे घडला. दरम्यान, खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना या तरूणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी 3 संशयितांवर पन्हाळा पोलिसात गुन्हा नोंद झाला असून 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पन्हाळा पोलिसांकडून मिळालेला माहिती अशी की, प्राजक्ता सुरेश बाऊचकर या तरूणीस अजित तानाजी पाटील, अक्षय गणपती चव्हाण व प्रदीप कृष्णात पाटील हे वारंवार त्रास देत असत. प्राजक्ता ही 23 आॅक्टाेबर रोजी दुपारी दुचाकीवरून कोलोली ते तेलवे या मार्गावरून नणुंद्रे गावी जात असताना तिला वाटेत अडवून या तिघांनी तिचा विनयभंग केला. तिला अश्वलील शब्द वापरले. त्यानंतर तिच्या मोबाईलवर मेसेजही पाठवले. यामुळे प्राजक्ता घाबरली. तिची मन:स्थिती बिघडली. यामुळे त्याच दिवशी तिने सायंकाळी तननाशक औषध प्राशन केले. कुटुंबियांनी तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राजक्ताची आई वैशाली बाऊचकर हिने पन्हाळा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अक्षय गणपती चव्हाण व प्रदीप कृष्णात पाटील या दोघांना अटक केली. तर अजित तानाजी पाटील याने घाबरून कीटकनाशक प्राशन केल्याने त्याच्यावर कोल्हापूरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, प्राजक्ताची मृत्यूची बातमी समजताच संतप्त ग्रामस्थांनी अजित तानाजी पाटील याच्या घरात घूसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. यामुळे काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता. मात्र पन्हाळा पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणून बंदोबस्त तैनात केला.
महत्वाच्या घडामोडी-
चंद्रकांत पाटलांनी मागच्या काळात निर्माण केलेल खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला
बेन स्टोक्स-संजू सॅमसनची वादळी खेळी; राजस्थान राॅयल्सची किंग्स इलेव्हन पंजाबवर 7 विकेट्सनी मात
“उर्मिला मातोंडकरांनी स्वीकारली शिवसेनेची ऑफर”
राजस्थान राॅयल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय