मुंबई : पुढील चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील असा दावा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या कल्याणमध्ये पाहणी दौऱ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी खासगी आणि सरकारी कोव्हिड रुग्णालयांची पाहणी केली.
“उद्धव ठाकरे आणि त्यांचं सरकार आता भयंकर भयभीत आहे. सीबीआयने रश्मी शुक्ला यांचा जबाब घेतला आहे. एफआयआरमध्ये अनिल परब यांचाही उल्लेख आला आहे, म्हणूनच ठाकरे सरकारमधील सहा मंत्री सीबीआयच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, परमबीर सिंग, रश्मी शुक्ला आणि सचिन वाझे यांच्यावर दबाब आणण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे,” असा आरोपही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
“पंकजाताई होणाऱ्या त्रासाची मला जाणीव, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे”; धनंजय मुंडेची फेसबुक पोस्ट