Home महाराष्ट्र पालघर जिल्ह्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी- ठाकरे गटाचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

पालघर जिल्ह्या पंचायत समितीवर राष्ट्रवादी- ठाकरे गटाचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा

पालघर : पालघर जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली सत्ता स्थापन केली आहे.

हे ही वाचा : “ठाकरेंना मोठा धक्का; आणखी एका खासदाराने शिंदे गटात केला प्रवेश”

जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांपैकी 4 पंचायत समित्या शिवसेना-राष्ट्रवादीने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला प्रत्येकी एक पंचायत समितीवर समाधान मानावे लागले.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा या चार पंचायत समित्यांवर विजय मिळविला आहे आहे. तर भाजपने जव्हार पंचायत समितीवर एकहाती सत्ता कायम राखली आहे. एकनाथ शिंदे गटाने मोखाडा पंचायत समितीवर ताबा मिळवला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“सुप्रिया सुळेनंतर, आता आदित्य ठाकरे, भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत चालणार”

संजय राऊत म्हणाले, शिवसेना बाळासाहेबांची, आता गुलाबराव पाटील म्हणतात…

खानाच्या कबरीवरील कारवाईचं संभाजीराजेंकडून स्वागत, म्हणाले…