मुंबई : ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जूनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. यावर शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचं काम करतो. तो दुकाने उघडायला आला तर शिवसैनिक उत्तर देतील. लॉकडाऊन उघडलं तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले. तसेच इम्तियाज जलीलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत खैरे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन”
मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात- अतुल भातखळकर
“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणार”