Home महाराष्ट्र महत्वाची बातमी!”मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी”

महत्वाची बातमी!”मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी”

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे.

मात्र पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची दूध कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण, मंगळवारी दुपारनंतर मुंबईत दुधाचे टँकर्स येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समजताच आता नागरिकांनी दूध खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे.

दरम्यान, आज मुंबईतील कुर्ला दूध डेअरीच्या परिसरात दूधाच्या गाड्या पोहोचल्या. यानंतर दुग्ध वितरण संघाकडून दुपारनंतर मुंबईत दूध पाठवले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांनी आत्ताच दूध विकत घ्यावे, असं आवाहन राजाराम बापू पाटील सहकारी दूध लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

‘भारत बंद’ ला राज्यभरात प्रतिसाद, बुलढाण्यात रेल्वे अडवली

संसदेत कृषी कायदा मांडला तेव्हा त्याला पाठिंबा दिला गेला, मग आता विरोध कसा?; विनोद तावडेंचा शिवसेनेवर निशाणा

आर्चीच्या ‘या’ नव्या लूकनं पाडलीय भुरळ; पहातच राहाल

राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले- बाळासाहेब थोरात