Home महाराष्ट्र राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक; महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार

राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक; महापालिका निवडणुकीची रणनिती ठरणार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मनसेची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक मुंबईच्या एमआयजी क्लब येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केली आहे. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून या बैठकीकडे राज्यातील मनसे सैनिकांचं लक्ष लागलं आहे.

हे ही वाचा : “आगामी महापालिका निवडणुकीसाठी अजित पवार-आदित्य ठाकरे पुणे दाैऱ्यावर, युती होणार?”

एमआयजी क्लबमध्ये सुरु असलेल्या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होणार का याबाबत देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आलेली आहे. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे येथील पक्ष पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेकडून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यपालांनी 12 आमदारांचा निर्णय घेतल्यास आम्ही त्यांचा नागरी सत्कार करू- संजय राऊत

“भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल”

राष्ट्रवादीलाच खिंडार पाडल्याशिवाय राहणा नाही; भाजप नेत्याचं राष्ट्रवादी नेत्याला जोरदार प्रत्युत्तर