Home महाराष्ट्र धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा- तृप्ती देसाई

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करा- तृप्ती देसाई

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात रेणु शर्मा या तरुणीने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली. यानंतर विरोधकांकडून वारंवार त्यांच्या राजीनामा मागितला जात आहे. आता सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असंही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भाजपच्या ‘या’ नेत्याचा रेणू शर्मांवर गंभीर आरोप; धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळ वळण

“धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल; राजीनामा देण्याची तयारी?”

राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही- प्रकाश आंबेडकर

माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे