Home महाराष्ट्र जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा, अशी मागणी असा आरोप रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने केला आहे.गेल्या पाच दिवसापासून मागासवर्गीय संशोधक विद्यार्थी हे परळी येथील उपविभागीय कार्यालय येथे एम.फील ते पीएच.डी. फेलोशिप मान्य करण्यात यावी या मागणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत.

मागासवर्गीय समाजाच्या अनेक योजना या जाणिवपूर्वक निधी अभावी डावलण्यात येत आहे. समाजकल्याणचा निधी जाणिवपूर्वक अखर्चीत ठेवून मागासवर्गीय समाजाला योजनांपासून वंचित ठेवण्याचे काम अकार्यक्षम मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने करत आहेत. हा सर्व प्रकार जातीय द्वेष भावनेतून होत आहे,रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा : “सर्वसामान्यांना मिळाला दिलासा; पेट्रोलच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी झाली घट”

समाजकल्याण खात्याचे मंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांनी अवघ्या तीस सेकंदाची भेट घेऊन अत्यंत मग्रूरीने विद्यार्थ्यांची संवाद साधल्याचा आरोप येथील उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

उपोषण स्थळी मागासवर्गीय विद्यार्थीनीही बसलेल्या आहेत. याचे भान सुद्धा धनंजय मुंडे यांना राहिलेले नाही. समाजाच्या उद्धारासाठी जर समाज कल्याणचा निधी खर्च होत नसेल. तर समाजकल्याण खाते काय कामाचे? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

दरम्यान, समाजकल्याण खात बंद करा किंवा अकार्यक्षम, जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करून त्यांच्या जागी बौद्ध व्यक्तीकडे पदभार द्यावा ही आग्रहाची मागणी यात करण्यात आलेली आहे. अन्यथा महाराष्ट्रात आंबेडकरी जनसमुदायाच्या वतीने आक्रमकपणे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”

“शिवसेनेत इनकमिंग सूरूच; ‘या’ माजी महापाैराच्या पुत्रानं हाती बांधलं शिवबंधन”

“मोठी बातमी! केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांची नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे दिले आदेश”