तू कोट्यवधींची मालकीण आहेस तर देशसेवेसाठी खर्च कर; राखी सावंतचा कंगणाला सल्ला

0
266

मुंबई : सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री राखी सावंतचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये राखीने अभिनेत्री कंगना रणाैतवर निशाणा साधला आहे.

राखीचा हा व्हिडिओ फोटोग्राफर विरल भयानीनं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी कारमधून उतरते आणि कारमधून उतरताचं सर्वत्र सॅनिटायझर मारायला लागते. कोरोना आता मोठा होत आहे. त्यामुळे काळजी घ्या असं देखील ती सांगताना दिसत आहे. शिवाय राखीने सर्वांना दोन मास्क लावण्याचा सल्ला दिला. व्हिडिओमध्ये तिने देखील दोन मास्क घातले आहेत.

यानंतर राखीला कंगणाच्या व्हिडिओ विषयी प्रश्न विचारण्यात आला. देशाची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. मोदीजी बरोबर आहेत की चुकीचे, कोरोना रुग्णांना अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. तुझे यावर काय मत आहे, असा प्रश्न राखीला विचारला. त्यावर राखीने, कंगना कृपा करून तू देशाची सेवा कर तुझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तर थोडे पैसे ऑक्सिजन खरेदीसाठी खर्च कर आणि लोकांना देखील मदत कर, असं म्हटलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाच्या घडामोडी –

क्विंटन डी कॉकची दमदार खेळी; मुंबईचा राजस्थानवर 7 विकेट्सने विजय

माजी पंतप्रधान डाॅ.मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात; एम्स रूग्णालयातून दिला डिस्चार्ज

“पोलिसांना धमकावल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल करा”

चार महिन्यात ठाकरे सरकारचे सहा मंत्री सीबीआयच्या दारात असतील- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here