मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लक्ष करण्यास सुरुवात केली. यावरून आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. देगलूर-बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणूक प्रचारा दरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.
हे ही वाचा : नानाभाऊ पटोलेच आता निवडून येणार; औरंगाबादच्या ‘या’ लोकगायिकानं गाण्यातून व्यक्त केल्या भावना
शिवसेना नेहमी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढत असते. आता मात्र मराठी माणसावर अन्याय होत असताना शिवसेना गप्प का बसली आहे. तुम्हाला वानखेडेंवर राग आहे, तर सचिन वाझेंवर इतके प्रेम का? तुमचे हप्ते घरी आणून देत होता म्हणून का? असा सवाल नितेश राणे यांनी शिवसेनेला यावेळी केला आहे.
दरम्यान, हिम्मत असेल तर समीर वानखेडेंवर कारवाई करुन दाखवा, मग पुढचा कार्यक्रम आम्ही करू, असा इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार; दिलीप वळसे पाटलांकडून संकेत
“Breaking News! भारत-पाक सामन्यानंतर हार्दिक पांड्याच्या प्रकृतीत बिघाड, रूग्णालयात केलं दाखल”
‘ठाकरे सरकार ड्रग्स माफियांच्या तालावर नाचतेय; अतुल भातखळकरांची टीका