आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोल्हापूर : हिमंत असेल तर असेल तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा, असं आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी किरीट सोमय्यांना दिला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
‘किरीट सोमय्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. जर त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढावा. साखर कारखान्यांचे गैरप्रकार उघड करण्यासाठी आम्ही प्रांत आणि पक्षांमध्ये कधीही भेदभाव केला नाही.’ असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
दरम्यान, जुलैमध्ये आलेल्या महापुराला महिना लोटला तरी शासनाकडून तुटपुंजी मदत मिळालेली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या जिल्ह्यांमध्ये महापूर आला. यामध्ये शेती, घरे, दुकाने यांची अतोनात हानी झाली. येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. या पूरग्रस्त नागरिकांना येत्या आठ दिवसांत नुकसान भरपाई मिळाली नाही तर या भागात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कधी ना कधी शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र येईल; भाजपच्या ‘या’ नेत्याचा दावा
अखेर ठरलं! ‘या’ तारखेपासून सूरू होणार शाळा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
किरीट सोमय्या यांच्याबाबत जे घडलं ते चुकीचंच- अजित पवार
जळगावात भाजपला मोठा धक्का; तब्बल 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश