हिंमत असेल तर एकएकटे लढा; चंद्रकांत पाटलांच महाविकास आघाडीला आव्हान

0
300

मुंबई : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 तर काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विजयासह महाविकास आघाडीच्या उमेदवाराने 6 पैकी 5 जागा जिंकल्या. नागपूर, पुणे, औरंगाबाद यासाख्या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आव्हान दिलं आहे.

निकालांमध्ये फार आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही. तीन पक्ष एकत्र येऊन एकाशी लढल्यावर वेगळं चित्र निर्माण होत नाही. असं असूनही आम्ही चांगला संघर्ष केला आणि निकराचा लढा दिला. या निकालांमध्ये मुद्दा असा की शिवसेनेला काय मिळालं याचा त्यांनी विचार करायला हवा. त्यांची अमरावतीची जागा गेली. याउलट या निकालांमध्ये राष्ट्रवादीचा फायदा झाला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुणे पदवीधर, मराठावाडा पदवीधर आणि अप्रत्यक्षरित्या अमरावती शिक्षक मतदार संघात त्यांना विजय मिळवता आला. मी या तिघांना आव्हान देतो की तुमची हिंमत असेल तर तुम्ही एकएकटे लढा. पण त्यांच्यात ती हिंमत नसल्याचं साफ दिसतंय, असंही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही- एकनाथ खडसेंचा टोला

हे यश म्हणजे मतदारांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती- सुप्रिया सुळे

‘ते’ मुख्यमंत्र्याचे काैतुक आहे की अब्रू काढणे हे फक्त अजित पवारच सांगू शकतात- अतुल भातखळकर

भाजपने आता तरी जनतेला गृहीत धरणे सोडावे- विजय वडेट्टीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here