Home महाराष्ट्र “हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवा”

“हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवा”

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना मंत्र्यांना घाबरलं आहे, त्यामुळे येत्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दाच कार्यक्रम पत्रिकेत घेण्यात आला नाही. यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी हिंमत असेल तर महाविकास आघाडीवर अविश्वास ठराव आणून दाखवावा, असं म्हणत फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, जर त्यांना तसं वाटत असेल तर त्यांनी अविश्वास ठराव दाखल करावा. वाजवून दाखवतो की, किती आमदार आमच्या सोबत आहेत आणि किती त्यांच्यासोबत, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांना खुलं चॅलेंज दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ते सर्व करु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“खुशखबर! पेट्रोल-डिझेलसह आता LPG सिलेंडर स्वस्त होणार”

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे काय महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

“कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषीला कठोर शिक्षा देऊ”