Home महाराष्ट्र विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा इशारा

विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा इशारा

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी सामनातून भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’ चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत., असं सामनात म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती 55 वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील!, असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन

शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम, परिणाम भोगावे लागतील- चंद्रकांत पाटील

“भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही”

“…अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावं”