मुंबई : राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 5 ऑगस्ट रोजी होणार आहे.. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हजेरी लावण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
पंढरपूर ला जाऊन लांबून दर्शन घेणारे आणि हार ही हातात न घेणारे मुख्यमंत्री.. अयोध्या ला जाऊन.. प्रभु राम च दर्शन किती लांबुन घेणार ? असा सवाल करत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तसंच बेबी पेग्विंन अयोध्याला जात असेल तर A.C ची सोय करून ठेवा! पेग्विंनला थंड हवा लागते.. नाहीतर लगेच गाडीत पळुन बसतो!, अशा शब्दात त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला आहे.
पंढरपूर ला जाऊन .. लांबून दर्शन घेणारे.. हार ही हातात न घेणारे मुख्यमंत्री..
अयोध्या ला जाऊन.. प्रभु राम च दर्शन किती लांबुन घेणार ?— nitesh rane (@NiteshNRane) July 20, 2020
आणि baby penguin अयोध्या ला जात असेल.. तर. A.C ची सोय करून ठेवा ! Penguin ला थंड हवा लागते..नाहीतर लगेच गाडीत पळुन बसतो !
Discovery चॅनेल वर पहिले होते !— nitesh rane (@NiteshNRane) July 20, 2020
महत्वाच्या घडामोडी-
दूध दर आंदोलनाला सुरुवात; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फोडला दुधाचा टँकर
.. तर कंगना रानौतने कलाविश्व सोडावं- करण जोहर
राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…
पवार साहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? : निलेश राणेंचा सवाल