Home महाराष्ट्र “खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या, तुम्हांला तुमची औकात दाखवून...

“खऱ्या आईचं दूध पिला असाल तर समोर या, तुम्हांला तुमची औकात दाखवून देऊ”

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरली.

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती., असं राणेंनी म्हटलं होतं.

राणेंच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे नोंदवले आहेत. आज सकाळी नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राणेंचे सुपूत्र व भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

कुठेतरी बॅनर लावा आणि मीडिया वर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यानी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध पियाला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ., असा जोरदार हल्लाबोल निलेश राणेंनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांचं पथक चिपळूणला रवाना”

“उद्धव ठाकरेंविरूद्ध अपशब्द वापरणाऱ्यांचे हात छाटण्याची शिवसेनेत धमक”

आता या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये- अतुल भातखळकर

ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणं हेच राणेंचं पोट भरण्याचं साधन- निलम गोऱ्हे