Home महाराष्ट्र शिवसेनेसोबत राहिल्यास काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येणार; अब्दुल सत्तार यांचा सल्ला

शिवसेनेसोबत राहिल्यास काँग्रेसला नक्कीच अच्छे दिन येणार; अब्दुल सत्तार यांचा सल्ला

मुंबई : आजच्या काँग्रेस ही उत्तर प्रदेशातील हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. यावर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांनी काँग्रेसच्या सध्याच्या स्थितीबाबत जे वर्णन केले आहे, ते अगदी योग्य आहे. काँग्रेस जर आमच्या सरकारमध्ये सहभागी झाली नसती तर त्यांची आणखी वाईट अवस्था झाली असती. भविष्यातही काँग्रेसने शिवसेनेला साथ दिली तर त्यांना राज्यात नक्कीच अच्छे दिन येईल, असा सल्ला अब्दुल सत्तार यांनी दिला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना हा राज्यातील सरकारमधला महत्त्वाचा पक्ष आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर शिवसेना मेन फ्युज आणि काँग्रेस-राष्ट्रवादी हे बाजूचे फ्युज आहेत. त्यामुळे मेन फ्युजला धक्का लागणार नाही याची खबरदारी दोन्ही पक्षांना घ्यावी लागेल. मेन फ्युजला थोडाही धक्का लागला तर सगळंच आपोआप बंद पडेल, असा टोलाही त्यांनी आघाडीतील दोन्ही पक्षांना यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“जतमध्ये काँग्रेसला खिंडार, अनेक मोठ्या नेत्यांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

किरीट सोमय्या टाकणार बॉम्ब; राष्ट्रवादीचा मंत्री आणि शिवसेनेचा नेता सोमय्यांच्या रडारवर, ते दोन नेते कोण?

“साकीनाका निर्भया बलात्कार कांड; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना”

साकीनाका बलात्कार प्रकरण; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ चार मागण्या