Home महाराष्ट्र आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील- अमोल मिटकरी

आम्ही तोंड उघडलं तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे बाहेर येतील- अमोल मिटकरी

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती दिली होती, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महागाईवर, दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या शेतकरी आंदोलनावर बोलण्यास वेळ नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलण्यास वेळ नाही, असं म्हणत केंद्र सरकारविरोधात असलेला रोष वळण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहेत, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आम्ही जर तोंड उघडले तर भाजप नेत्यांचे काळे कारनामे पडद्यासमोर यायला वेळ लागणार नाही, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे यांना मी ओळखत नाही, त्यांच्या मदतीसाठी पुढे येण्याचा संबंध नाही”

“सांगलीत 5 किलो सोने लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी केलं जेरबंद”

“शरद पवारांनी नैतिकता पाळावी, चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा”

“धनंजय मुंडे हे निर्दोष आहेत, त्यांचा राजीनामा मागण्याचा अधिकार कुणालाही नाही”