“आम्ही तोंड उघडलं तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल”

0
212

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका सुरू केली. यावरुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेत्यांनी काल राज्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपाची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेरं आम्ही पाहत आहोत. संवैधानिक पदांचा दुरुपयोग व संवैधानिक मर्यादांचे उल्लंघन केलं जात आहे. यावर आमचं लक्ष आहे. भाजपाच्या षडयंत्राची आम्हाला माहिती आहे,” असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर भाजपा ची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी, असंही सचिन सावंत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

भाई जगताप एक असा टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं, पण डरपोक असल्यामुळे…; निलेश राणेंचा हल्लाबोल

“वाह अमृता फडणवीस वाह..! काय हा माज, गायकी पेक्षा मवालीगिरीत उत्तम करियर करू शकाल”

लवंगी फटाका की, बाॅम्ब हे लवकरच स्पष्ट होईल; फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

“बाॅलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोना पाॅझिटिव्ह”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here