लायकीत रहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू; मनसेचा संभाजी ब्रिगेडला इशारा

0
427

पुणे : संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

राज ठाकरे यांना जसं पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचं आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचे देखील आकलन नाही. राजकारणात कुठेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका प्रविण गायकवाड यांनी केली होती. यावर आता मनसे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिली.

मी प्रविण गायकवाड, मी प्रविण गायकवाड असं गल्लो गल्ली सांगत फिरताना मी तुला स्वतः पाहिलंय. 2019 ला पुण्यातून लोकसभेला उभा राहायला इच्छूक असणारा तू, तुला काय राज ठाकरे कळणार. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू, असा इशारा वसंत मोरे यांनी प्रवीण गायकवाड यांना दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंच्या  सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही”

जेवढ्या उंचीची आहे मी, तेवढीच लायकी ठेवा; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर भडकल्या

पत्नीला किस करायला गेला आणि…; नवरदेवाच्या उडालेल्या फजितीचा व्हिडिओ व्हायरल

“डाॅ.भागवत कराड पंकजा मुंडेंच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची पंकजा-प्रीतमच्या नावाने जोरदार घोषणाबाजी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here