Home महाराष्ट्र ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर…’; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर…’; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या नाट्यामध्ये दररोज नवनवे अंक घडताना दिसत आहेत. अशातच आज शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी वाधवान यांच्यासोबत किरीट सोमय्या यांचे व्यावहारिक संबंध असल्याचा आरोप केला.

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर किरीट सोमय्यांनी लागलीच पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हे ही वाचा : पुण्यात होणार मनसेचा वर्धापनदिन सोहळा; मनसेची जोरदार तयारी सुरू

“माझा वाधवान यांच्याशी काडीचाही संबंध नाही. राऊतांना मुंबई पोलिसांनी दोन पानांचं उत्तर दिलेलं आहे. मी कोणत्याही पत्रकार परिषदेत अधिकृत कागद हातात असल्याशिवाय कोणतीही गोष्ट बोललेलो नाही. हे फक्त नौटंकी करत आहेत”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरेंमध्ये एवढी हिंमत असेल तर सामनामध्ये अग्रलेख लिहावा त्यांनी की ते न्यायाधीश ईडीचे पाचवे एजंट आहेत. तिथे तर किरीट सोमय्या न्यायाधीश नाही ना? 19 बंगल्यांच्या बाबतीत बोलायची हिंमत का नाही उद्धव ठाकरेंची?” असा सवालही किरीट सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माझा शब्द लक्षात ठेवा, ईडीचे काही अधिकारी लवकरच जेलमध्ये जाणार- संजय राऊत

शिवसेनेची मोठी खेळी; भाजप-राष्ट्रवादीच्या मतभेदात अनेकांनी केला शिवसेनेत प्रवेश

“IPL 2022 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, ‘हा’ आक्रमक गोलंदाज आयपीएल खेळणार नाही”