आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी बाबरी मशीद पाडण्यासाठी आपण अयोध्येत उपस्थित असल्याच्या दावा केला होता. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत फडणवीसांची खिल्ली उडवली. त्यानंतर आता भाजपाकडून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पलटवार केला आहे.
हे ही वाचा : …. म्हणून सुप्रिया सुळेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे मानले आभार, म्हणाल्या…
तुम्ही दुसऱ्यांच्या वजनाबद्दल, व्यंगाबद्दल, बोबडेपणाबद्दल विधाने करतात. मग तुझ्या मुलाच्या आवाजाबद्दल कोणी म्याव म्याव आवाज काढला किंवा त्याच्याबद्दल काही म्हटले तर तुम्हाला वाईट का वाटते?, असा सवाल नितेश राणे यांनी यावेळी केला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दुसऱ्यांची टिंगलटवाळी करता तर मग स्वतःबद्दल कोणी काही म्हटले तर ते ऐकण्याची थोडी हिंमत ठेवा. देवेंद्र फडणवीसांनी बाबरीवर पाय ठेवला असता तर ती पडली असती असे म्हणालात. तर उद्धव ठाकरे तिथे उभे राहिले असते तर हवेने उडून गेले असते असं आम्ही म्हणायचे का?, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“आधी पुणे शहराध्यक्षपदावरून आणि आता…; मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा एक धक्का”
“शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट भोवली; अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी”
शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला, राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…