Home महाराष्ट्र “जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल”

“जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल”

मुंबई : एक राजा तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन. आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेते व  खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जातीय आरक्षण रद्द करा, अशी मागणी केली म्हणून जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे. तसेच प्रकाश आंबेडकरांना जर उदयनराजेंचं मत पटलेलं नसेल तर त्यांनी आरक्षणाबाबत जनमत घ्यावं, असंही आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन”

एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर- प्रकाश आंबेडकर

ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि…; स्टार प्रचारकांच्या यादीवरून निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील; दानवेंच्या टीकेवर काॅंग्रेसचं प्रत्युत्तर