Home महाराष्ट्र “त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार”

“त्यांच्याकडे केंद्राची सत्ता असेल तर आमच्याकडे महाविकास आघाडी सरकार”

मुंबई :  भाजप ठरवणार, भाजप मागणी करणार, भाजपची लोकं निर्णय घेणार, भाजपची लोकं लोकांना अटक करणार, लोकांना दंड ठोठावणार, ही लोकशाही आहे का?. आम्ही बोलू तोच कायदा, आम्ही बोलू तेच होणार इतकी लोकशाहीची थट्टा होऊ शकत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक  यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

भयाचं वातावरण निर्माण करायचं, लोकांवर राजकीय दबाव आणायचा, असा प्रयत्न भाजप देशभरात करत आहे. परंतु त्यांचं बंगाल मॉडेल फेल ठरलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रातही बंगाल मॉडेल राबवायची भाजपची इच्छा असेल तर जरुर राबवावं. भाजपच्या डावपेचाला महाविकास आघाडीतील एकही पक्ष घाबरत नाही, असा इशाराही मलिक यांनी भाजप नेत्यांना दिलाय.

महत्वाच्या घडामोडी –

“पडळकर ही एक प्रवृत्ती आहे, आणि अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत”

अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चाैकशी करा; भाजपचं अमित शहांना पत्र

“अहमदनगरमध्ये सांगली-जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती; महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता”

“चंद्रकांत पाटील यांचं चित्रा वाघ यांना पत्र; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”