परळी : भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रासप नेते महादेव जानकरयांनी बीडमधील परळी येथे गोपीनाथ गडावर हजेरी लावली. ‘टीव्ही9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
गोपीनाथराव हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते. मी पंकजा मुंडे यांच्या सुखाऐवजी दुःखात जास्त सहभागी आहे. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो. तसा मी झालो. मुंडे साहेब आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं, असं महादेव जानकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मुंडे साहेब बापमाणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोबत आहे” असंही महादेव जानकर म्हणाले
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवार यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही- गोपीचंद पडळकर
‘येडं पेरलं अन् खुळं उगवलं’ अशी ठाकरे सरकारची गत झाली आहे- गोपीचंद पडळकर
मराठा समाजाच्या हिताचा खून ठाकरे सरकारने केला; आशिष शेलारांचा हल्लाबोल
शरद पवारांमुळे मराठा आरक्षण मिळालं नाही, या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचं नाही- गोपीचंद पडळकर