Home पुणे राष्ट्रवादीबरोबर समझोता न झाल्यास काँग्रेससोबत निवडणूक लढवू; शिवसेना नेत्याचं विधान

राष्ट्रवादीबरोबर समझोता न झाल्यास काँग्रेससोबत निवडणूक लढवू; शिवसेना नेत्याचं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : देहू नगरपंचायतीची निवडणूक येत्या 21 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर देहू नगर पंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणताही समझोता न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून प्रस्ताव आल्यास काँग्रेसला सोबत घेऊन देहू नगर पंचायत निवडणूक लढवू, असं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा : “अखेर ‘मातोश्री’नं घेतली दखल; शिवसेनेच्या ‘या’ नाराज आमदाराचा राष्ट्रवादीतील प्रवेश थांबवला”

पीएमआरडीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमच्यासोबत आघाडी केली. त्यावेळी आम्ही त्यांच्या उमेदवारांना मदत केली. देहूमध्ये नगर पंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती होण्यास विलंब होत आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार सुनील शेळके यांच्यासोबत येत्या दोन दिवसांत चर्चा होणार आहे. नगर पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव दिल्यास आम्ही आघाडीसाठी तयार आहोत. मात्र, तसा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. 17 जागांसाठी नगर पंचायत निवडणुकीसाठी बारा जणांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली आहे, असं सचिन अहिर म्हणाले आहेत.

दरम्यान, देहू नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांचा मार्गदर्शन मेळावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी देहू शहर शिवसेना प्रमुख सुनिल हगवणे, बाबा भालेकर, रमेश हगवणे, राजेंद्र काटे, रमेश जाधव, लतिका फास्ते, राजेश पळसकर, राजेश खांडभोर, नगरसेविका कल्पना आखाडे, शैला खंडागळे आदी उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेत राजकीय भूकंप; 58 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा

“शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

राजकारणात कुणाला घाबरत नाहीत, पण देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती