Home महाराष्ट्र “सरकारमध्ये थोडी जर चाड शिल्लक असेल, तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा”

“सरकारमध्ये थोडी जर चाड शिल्लक असेल, तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकारमध्ये थोडी चाड शिल्लक असेल तर नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा., असं विखे पाटील म्हणाले. तसेच कॅबिनेट मंत्री सरकारी अधिकाऱ्याला धमक्या देतात. न्याय देण्यासाठी न्यायालय, उच्च न्यायालय असताना आजकाल मंत्री धमक्या देत आहेत, असंही विखे पाटील यांनी यावेळी म्हटलं.

हे ही वाचा : “कोणाच्याही नादाला न लागता पंजाला मतदान करा, शेवटी तुमची कामे मीच करणार”

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेच्‍या अधिकाऱ्याला धमकविण्‍याचा प्रकार यापूर्वी राज्‍यात कधीही घडला नव्‍हता. तपास यंत्रणांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचा नायनाट करावा. एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि तो उघड करणाऱ्या संस्थांना बदनाम करण्याचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येईल, असा विश्वास विखे पाटलांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी – 

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन; पुण्याचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईकडे रवाना

“राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सूरूच; भंडाऱ्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश”

शिवसेनेशी लढण्यासाठी भाजपा राज ठाकरेंचा वापर करत आहे; शिवसनेचा आरोप