Home महाराष्ट्र 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर…; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

14 दिवसाचं अधिवेशन झालं तर…; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : राज्य विधिमंडळाचं यावर्षीचं पावसाळी आधिवेशन केवळ दोन दिवसांचं होणार असल्याचं ठाकरे सरकारने सांगितलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी  राज्य सरकारवर टीका केली आहे.

14 दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. ते मुंबईमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, 14 दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे ठाकरे सरकारला जास्त दिवस आधिवेशन ठेवायला भीती वाटत आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सरकार पावसाळी अधिवेशनापासून पळ काढतंय- प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार; आमदार रवी राणांचा आरोप

मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे….; रामदास आठवलेंचा त्यांच्या खास शैलीत विरोधकांना टोला

सरकार कोरोनाला घाबरत नाही तर विरोधी पक्षाला घाबरतंय- चंद्रकांत पाटील