आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मागील तीन आठवड्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला अखेर यश आलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. तशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
ठाकरे सरकारनं पगारवाढ जाहीर करूनही एसटी कामगार विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पगारवाढ केल्यानंतर आझाद मैदानावर सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा दिली.
हे ही वाचा : राणे म्हणाले, मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार; नाना पटोले म्हणतात..
विलीनीकरण वगळता इतर मागण्या मान्य झाल्याचे जाहीर करताच परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं होतं. मात्र या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आता अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना इशारा दिला आहे.
न्यायालयाने संप बेकायदेशीर ठरवला तर एक दिवसाला 8 दिवसांची पगारकपात केली जाईल. कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान करायचं नाही. जे कर्मचारी कामावर येतील त्यांना संरक्षण दिलं जाईल. एसटीने प्रवास करणारे प्रवासी हे आपलं दैवत आहेत. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर एसटी अडचणीत येईल. कामगारांनी कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये., असं परब म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीची धाड”
…तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर
राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार- नारायण राणे