Home महाराष्ट्र सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर आज तुम्ही…; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत गेली, असा आरोप विरोधी पक्ष भाजपकडून सातत्यानं करण्यात येत असतो. यावरून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

आम्ही काँग्रेससोबत उघडपणे गेलो. तुमच्यासारखं लपून सकाळची शपथविधी घेऊन राष्ट्रवादीसोबत गेलो नाही. तुमचा सकाळच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता तर आज अनिल देशमुख आणि नवाब मलिक तुमच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते शिवसेनेच्या आयोजित सभेत बोलत होते.

हे ही वाचा : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत; छगन भुजबळ संतापले

दरम्यान, या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपच्या ए.बी.सी. टीम पुढे केल्या जातात. कुणाला थडग्यावर डोके टेकायला लावतात, कुणाला घंटा बडवायला दिला जातो, तर कुणाला भोंगा दिला जातो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्यासोबत होता, त्यामुळे…; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

कोण आहे नवनीत राणा?, त्या…; विद्या चव्हाण यांची जीभ घसरली.

“शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणं पडलं महागात, अभिनेत्री केतकी चितळेला पोलिसांकडून अटक”